Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

असंच का?... तसं का नाही?
Subject : Philosophy
Language : Marathi
Author : Jothish Kumar
Binding : NA
First Edition : 01/12/2013
Current Edition : 01/12/2013
Size : 140 x 216 mm
Price : 180
Web Price : 160
News & Reviews
Awards
About Author
978-93-80234-33-5
    Ask Why? Think.....Why Not? या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. अनिल खडके यांनी केलेला आहे. आपल्यात सतत सुधारणा व्हायला हवी आणि त्याचं मोजमापही करता यायला हवं. ह्या सुधारणेच्या मोजमापासाठी ‘प्रमाणही’ हवं. साधारणत: हे ‘प्रमाण’ निवडण्यातच आपण चूक करतो. आपल्यातला बदल दुसर्‍याच्या तुलनेनं मोजणं हीच ती चूक. इतरांशी स्पर्धा करून पुढे जाण्यापेक्षा, ‘मला कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्त चांगलं व्हायचं आहे’ ही आपली सुधारणेमागची प्रेरणा हवी. स्पर्धा हवी पण ती इतरांशी नको तर स्वत:शीच हवी. समस्या ह्या संधीचे कपडे अंगावर चढवूनच समोर येतात. प्रयत्नशील माणसाला ते दिसतात आणि सबबी शोधणार्‍यांसाठी ते अदृश्य असतात इतकाच फरक. अपयश ही पुन्हा नव्याने आणि अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्याची एक नामी संधी असते. क्षुल्लक गोष्टीची शोकांतिका बनवू नका. आनंद कुठे मिळेल आणि केव्हा मिळेल ह्याचा शोध घेत बसू नका. तो तुमच्याचपाशी असतो आणि सदैव असतो. गरज असते ती विचारी मनाने त्याच्यापर्यंत पोहोचण्याची अर्थात आपली दृष्टी बदलण्याची आणि स्वतःच स्वतःला विचारण्याची असंच का?... तसं का नाही?
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer